Posts

चूक

Image
एक चुकीचे कर्म तुमच्या ९९ चांगल्या कर्मावर पाणी फिरवते ! -कथा आहे महाभारतातील !  कर्ण चारित्र्यवान, दानशूर होताच तितकाच तो प्रजेसाठी सतत जागृत होता. त्याच्या दारी आलेल्याला कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवलं नव्हतं. प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती !  इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले.  हे अनेकांना न उलगडलेले कोडे !  तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले ! युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले "कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरी तुम्ही त्याला का मारले..?" त्यावर कृष्णाने सांगितलं की,  "नक्कीच कर्ण दानशूर होता,  चारित्र्य संपन्न होता. याचकाला कधीही त्याने विन्मुख पाठवले नाही. अशी अनेक चांगली कामे (कर्म) त्याने केले.  मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता तेव्हा खरेतर त्याने सर्वाना जणू पराभूत केलेच होते त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते. मात्र बाहेर पडण्या...